SarjanSpandan

Search results

Friday, May 28, 2021

गप्पा गोष्टी 3



माणूस सगळ्यात जास्त प्रेम कोणावर करतो तर फक्त स्वतःवर! हे एक कटू सत्य मी गप्पांच्या ओघात एकाच्या तोंडून ऐकले आणि जवळ जवळ उडालोच. जमलेल्या पैकी सगळ्यांनी त्याला उडवून लावले. कोणी सांगितले मी आईवर जास्त प्रेम करतो. तिचेही माझ्यावर खूप प्रेम आहे. त्याने विचारले जास्त आणि खूप याला पुरावा काय. एकाने सांगितले माझे माझ्या बायकोवर प्रेम आहे. कोणी काय आणि कोणी काय सगळ्यांनी वेगवेगळ्या कबुल्या दिल्या. पण कटू सत्य हे एखाद्या हाडाच्या सांगाड्या सारखे असते. ते नर्ममुलायम त्वचा पांघरुन असते तेव्हा खरे वाटत नाही. आणि उघडे पडले तर सगळे मिथ्या खोटे भ्रम वाटू लागते. मला लगेच माकडीणीची गोष्ट आठवली. एका हौदात पाण्यात बुडू लागलेली माकडीण जीवाच्या आकांताने आपल्या लेकराला निकराचे प्रयत्न करते. पण शेवटी ती स्वतः बुडू लागते तेव्हा सरळ पिल्लाला पायाखाली घालून ती हौदाबाहेर निसटते.

         गप्पांचा ओघ क्षणात कोठे जाईल त्याचा नेम नसतो. गप्पांचे एक असते की आपापसात केमिस्ट्री जुळल्याशिवाय मनमुराद मोकळ्या गप्पा रंगत नाही. गप्पा मारणारे कंपू असतात. ते सहसा कंपूत कोणा बाहेरील आगंतुकाला सहजासहजी सामावून घेत नाही. आपल्या गप्पा आपल्या कंपुपुरत्या राहिल्या पाहिजे. काही वेळा गप्पांचे स्वरुपही तसेच असते. खलबतं केल्यासारख्या. गट तट करुन गुप्त चर्चा झडत राहतात. काही गप्पा हलक्या आवाजात कानोकान होत राहतात. अशावेळी फक्त हास्यस्फोट तेवढे ऐकू येतात.

@विलास आनंदा कुडके

No comments:

Post a Comment

अवघाची वेळ सुखाने घालवीन

 #अवघाची वेळ सुखाने घालवीन          वेळ घालवण्याचा प्रसंग  तुमच्यावर कधी आला आहे का ? कदाचित एकदम आठवणार नाही पण आपला क्रमांक येईपर्यंत, अपे...